भारतीय पाककलेतील महत्त्वाचा मसाले पदार्थ म्हणजे विलायची. तिला इलायची, वेलची किंवा वेलदोडा या नावांनीही ओळखलं जातं. स्वयंपाक घरात उपयोगी असली तरी आयुर्वेदातही विलायचीला मानाचं स्थान आहे. विशेष गुणकारी असलेल्या या मसाले पदार्थाचे मोठी विलायची आणि छोटी विलायची असे दोन प्रकार आहेत. यापैकी मोठी विलायची मसाल्याच्या पदार्थात वापरली जाते, तर छोटी विलायची औषधात वापरली जाते.
घरच्याघरी पुढीलप्रमाणे विलायचीचा वापर करता येऊ शकतो –
1. विलायची मुळतः सुगंधी आहे. त्यामुळे ज्यांच्या मुखाची दुर्गंधी येते त्यांनी विलायची चघळल्यास मुखदुर्गंधी नष्ट होते. सामान्यतः मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या मुखाचा दुर्गंध येतो, त्यांनी विलायचीचा वापर करावा
2. मळमळ किंवा उलटी होत असल्यासही विलायची चघळावी किंवा विलायचीची पूड करुन चघळावी. त्यामुळे त्वरित आराम मिळतो.
3. कोरडा खोकला येत असल्यास विलायचीची पूड पिठीसाखरेसोबत मिसळून 15-15 मिनिटांच्या अंतराने चघळावी.
4. कफसह खोकला असल्यास विलायचीची पूड मधामध्ये मिसळून ते मिश्रण 15-15 मिनिटांच्या अंतराने चाटावे. खोकला नक्की कमी होतो.
5. अॅसिडिटीवरही विलायची गुणकारी आहे. विलायची चावून खाल्ल्याने तोंडात विविध प्रकारचे तेल निर्माण होते. जे लाळ ग्रंथींना उत्तेजित करते, त्यामुळे पोट व्यवस्थित काम करते.
No comments:
Post a Comment