सिंहासन-
तुमच्या परिचयातील कोणी अस्पष्ट किंवा गुंतत गुंतत बोलते का? तर त्यांना हे आसन करायला सांगा. सिंहासनाने फक्त गळ्याचाच विकास होतो, असं नाही. तर गळ्याशी संबंधीत अनेक व्याधीही बऱ्या होतात...
आसनकृती-
१. प्रथम वज्रासनात बसावे.
२. गुडघ्यांत अंतर ठेवावे व गुडघ्यांवर हात पालथे ठेवावे व बोटांत
अंतर ठेवावे.
३. 'आ' करून
(तोंड जेवढे उघडता येईल तेवढ उघडवे) जीभ बाहेर काढून डोळे विस्फारून दृष्टी
नासाग्र किंवा भ्रूमध्यावर स्थिर करावी.
४. मान वाकवून हनुवटी गळ्यावर दाबावी व लाळ गळू द्यावी.
५. गळ्यावर दिलेला दाब काढून मान सरळ करावी.
६. वज्रासनातून पुर्ववत स्थितीत यावे.
उपयोग-
आसनाच्या नियमित अभ्यासाने खालील उपयोग होतात.
१. ज्यांच्या श्वासाला व तोंडाला दुर्गंध येतो त्यांनी करावे.
दुर्गंधी कमी होते.
२. अस्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तींनी याचा अभ्यास केल्याने शब्दोच्चारण
स्पष्ट होते.
३. अर्दित (Facial palsy) व्याधीत उपयोगी आहे.
४. गळ्यावर दाब पडल्याने गलग्रंथी (Thyroid gland)कार्य सुधारते.
Hypothyroidism व Hyperthyroidism मध्ये उपयोगी आहे.
५. आंत्रविकार व बद्धकोष्ठता दूर होते.
|| आयुर्वेदोऽमृतानाम् ||
No comments:
Post a Comment