रोजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होणे साहजिकच आहे. मात्र या सगळ्यातून थोडा वेळ काढून आरोग्यासाठी उपयुक्त असा प्राणायाम केला तर त्याचे काय फ़ायदे आहेत, प्राणायामचे नक्की कोणकोणते फायदे आहेत जाणून घेऊया.
प्राणायाम हा अष्टांग योगातील चौथा आणि प्रमुख भाग. आचार्य पतंजलींनी प्राणायामची परिभाषा पुढील प्रमाणे वर्णन केलेली आहे.
‘तस्मिन्सति श्वासप्रश्वासयो:
गतिविच्छेद् प्राणायाम:।’
- पातंजल योग दर्शन
प्राण + आयाम या दोन शब्दांपासून प्राणायाम ह्या शब्दाची निर्मिती होते. प्राणाचा आयाम करणे म्हणजेच श्वासोच्छ्वासाचे नियमन आणि नियंत्रण करणे. नियमित प्राणायाम केल्याचे फ़ायदे पुढील प्रमाणे होतात -
1. चित्त एकाग्र होते
2. मनाला स्थिरता प्राप्त होते
3. श्वासोच्छ्वासाची संख्या कमी होऊन जीवनीय शक्ती वाढते आणि ती व्यक्ती दिर्घ जीवन जगते
4. थकवा दूर होतो आणि उत्साह वाढतो
5. मानसिक स्वास्थ्य लाभते.
No comments:
Post a Comment