वज्रासन | जेवण झाल्यानंतरही करता येणारं आसन

वज्रासन हे असं एकमेव आसन आहे, जे जेवणानंतरही करता येतं. त्यामुळे आता जेवण झालंय, आसन करायला नको, असा विचार असेल तर तो सोडून हे आसन नक्की करुन पाहा... खाली दिलेले फायदे नक्की होतील...


आसनकृती-


१. पाय सरळ करून बसावे.

२. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून मागे न्यावे.

३. दोन्ही पायच्या टाचा व अंगठे एकमेकांना जोडून त्यावर बसावे.

४. दोन्ही हाताचे तळवे गुडघ्यावर ठेवावे.

५. पाठीचा कणामान ताठ ठेवावी. शरीर स्थिर ठेवावे.

६. दिर्घ श्वसन करावे.

उपयोग-


१. भोजनानंतर करता येणारे एकमेव आसन असून हे नियमित केल्याने पचनशक्ती सुधारते.

२. मलबद्धता दूर होते.

३. Sciatica व्याधीत उपयोगी.

४. पोटाचे, पायाच्या स्नायुंना बल प्राप्त होते.


|| आयुर्वेदोऽमृतानाम् ||

No comments:

Post a Comment