भद्रासन -
|| भद्रासन भवेदेतसर्वव्याधी विनाशनम् ||
भद्र या शब्दाचा अर्थ होतो अनुकूल किंवा सुंदर... हे आसन जास्त वेळ ध्यान केंद्रीत करण्यासाठी अनुकूल तर आहेच, शिवाय शरीर निरोगी राहण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. ह्या आसनाला गोरक्षासन असेही म्हणतात.
आसनकृती-
१. बसलेल्या अवस्थेत दोन्ही पायांचे तळवे मूत्रेन्द्रियाच्या जवळ
आणावे.
२. दोन्ही गुडघ्यात अंतर ठेवून तळवे एकमेकांना जोडून बसावे.
३. हातावर भार देऊन टाचेवर बसावे.
४. एकावर एक पालथे हात पायाच्या अंगठ्यावर ठेवुन शरीर ताठ ठेवावे.
५. दृष्टी समोर ठेवावी.
६. हात काढून शरीर सैल सोडावे.
७. जमीनीवर बसून गुडघे पुर्ववत वर करावे.
उपयोग-
१. ज्यांना वारंवार मलावरोधाचा (मलावष्टंभाचा) त्रास होतो त्यांनी
याचा उपयोग करावा.
२. भूक वाढते व पाचन शक्ती सुधारते.
No comments:
Post a Comment