पद्मासन कसे करावे आणि त्याचे उपयोग, वाचा...

पद्मासन  -

         
       || इदं पद्मासनं प्रोक्तं सर्व व्याधीविनाशनम् ||



या आसनाला पद्मासन किंवा कमलासन असे म्हणतात. या आसनाच्या स्थितीमध्ये शरीराचा आकार कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसतो म्हणून याला पद्मासन म्हणतात.... पुढे वाचा...





आसनकृती -


१. दोन्ही पाय समोर पसरून बसावे.

२. डाव्या मांडीवर उजवी टाच आणि उजव्या मांडीवर डावी टाच पोटाला टेकवून ठेवावी.

३. बसलेल्या अवस्थेत पाठीचा कणा ताठ करावा. अंगठा व त्या शेजारील बोट जुळवून उताणे तळहात मांडीवर ठेवावे म्हणजे ज्ञानमुद्रा साधते.

४. छाती ताठ ठेवून, पोट सावकाशपणे आंत घ्यावे व दिर्घश्वसन करावे.

५. पाय बदलून पुन्हा हीच क्रिया करावी.




उपयोग-


१. सर्व प्रकारच्या व्याधींमध्ये हे आसन उपयोगी आहे.

२. मेरूदंड(पाठीचा कणा) लवचीक होतो.

३. भूक वाढते व पचनशक्ती सुधारते.

४. अस्थमा(Asthama) असणार्यांनी हे आसन 
दररोज नियमित करावे. फुफ्फुसांची क्षमता वाढते.

५. ह्रदयाची शक्ती वाढते.

६. गर्भाशयाचे स्नायू बळकट होऊन
स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहते.

७. बुद्धी, मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवते.

८. शरीराला नवीन स्फुर्ती प्राप्त होते.

      ||  आयुर्वेदोऽमृतानाम्  ||

No comments:

Post a Comment