सुप्त वज्रासन | पचनासंबंधी विकारांवर रामबाण आसन

सुप्त म्हणजे झोपलेला आणि वज्र हे एका नाडीचं नाव आहे. जिचा संबंध कामशक्तीशी आहे. देवांचा राजा इंद्राच्या अस्त्राचं नावही वज्र आहे. हे आसन कामशक्ती वाढवण्यासाठी लाभदायी तर आहेच शिवाय पचनासंबंधी विकारांवरही रामबाण उपाय ठरतं. अध्यात्मिक उद्देशासाठीसुद्धा हे आसन सर्वश्रेष्ठ मानलं गेलंय.

वज्रासन | जेवण झाल्यानंतरही करता येणारं आसन

वज्रासन हे असं एकमेव आसन आहे, जे जेवणानंतरही करता येतं. त्यामुळे आता जेवण झालंय, आसन करायला नको, असा विचार असेल तर तो सोडून हे आसन नक्की करुन पाहा... खाली दिलेले फायदे नक्की होतील...

भद्रासन | मलःनिस्सारणासह अनेक व्याधींवर गुणकारी

भद्रासन -


|| भद्रासन भवेदेतसर्वव्याधी विनाशनम् ||



भद्र या शब्दाचा अर्थ होतो अनुकूल किंवा सुंदर... हे आसन जास्त वेळ ध्यान केंद्रीत करण्यासाठी अनुकूल तर आहेच, शिवाय शरीर निरोगी राहण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. ह्या आसनाला गोरक्षासन असेही म्हणतात.
   

सिंहासन | स्पष्ट बोलण्यासह गळ्याच्या अनेक व्याधींवर रामबाण उपाय

सिंहासन-

तुमच्या परिचयातील कोणी अस्पष्ट किंवा गुंतत गुंतत बोलते का? तर त्यांना हे आसन करायला सांगा. सिंहासनाने फक्त गळ्याचाच विकास होतो, असं नाही. तर गळ्याशी संबंधीत अनेक व्याधीही बऱ्या होतात...